Pune News | ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट | Sakal Media
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अमोल मिटकरी यांच्या विधाना विरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघाने राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जोरदार आंदोलन केले
ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी च्या कार्यालयात जात शांती पाठ आणि पारंपरिक वेषात मंत्रघोष करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या आंदोलनामध्ये ब्राह्मण महासंघाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झालेली पाहायला मिळाली.ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला या वेळेस मोठा गोंधळ उडालेला पाहिला मिळाला. यावेळी काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. यावेळी ब्राह्मण महासंघाच्या वतीने अमोल मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली.